मारेगाव करंजी मार्गांवरील गोविंदराजा कोटेक्स जवळील घटना
भास्कर राऊत मारेगाव
मारेगाव येथील आपले काम आटोपून आपल्या गावी परत जात असतांना राज्य महामार्गावरील गोविंदराजा कोटेक्स जवळ अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना दि.20 जून 2025 रोज शुक्रवारला 4 वाजताच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव अमित भास्कर दर्वे वय अंदाजे 24 वर्षे असे असून तो तालुक्यातील महागाव( सिंधी) येथील रहिवासी आहे.
अमित हा दि. 20 जूनला सकाळी महागाव येथून काही कामानिमित्त मारेगाव येथे आला होता.तेथील काम आटोपून तो दुपारी 4 वाजताच्या सुमारास महागाव ( सिंधी) येथे जाण्याकरिता निघाला. पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.यात तो गंभीर जखमी झाला झाला.
काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
अमितने नुकतेच तालुक्यातील कुंभा येथे हेअर सलून टाकले होते. काही साहित्य घेण्यासाठी तो मारेगाव येथे गेला होता. परंतु वाटेतच त्याचा अपघात झाला. त्याच्या पायाला जबर मार लागला असून इतर ठिकाणीही मार लागलेला आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
