भास्कर राऊत मारेगाव
घरी कोणीच नसल्याचे पाहून एका युवकाने आपल्या राहत्या जुन्या घरी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नवरगाव येथे दि. 31 मे ला सकाळी 11.45 वाजताच्या दरम्यान घडली.आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव शुभम तुळशीराम करलुके, वय 32 असे आहे.
शुभमच्या आईच्या नावे घरकुल आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले घर बांधकामासाठी खोलले असून ते बाजूच्या घरी किरायाने राहत होते. आई काही कामानिमित्त बाहेर गावला गेलेली होती. शुभम आणि त्याचा भाऊ हे दोघे घरी होते. आई नसल्याने शुभमचा भाऊ हा नळावर पाणी भरण्यासाठी गेला होता. अशातच शुभमने आपल्या खोललेल्या जुन्या घरी डिशच्या केबलने आत्महत्या केली.सदर घटना सकाळी 11.45 वाजता उघडकीस आली.
शुभम हा अविवाहित होता. तो तलावमध्ये मासळी पकडण्याचे काम करायचा. शुभमचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला होता.शुभमच्या पश्चात आईवडील, भाऊ, विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. शुभमच्या आत्महत्येचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
