आरोपी विरोधात गुन्हा दाखल
भास्कर राऊत मारेगाव
लग्नाचे अमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. वारंवार झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. सदर घटना मारेगाव तालुक्यातील एका गावात घडली असून आरोपीविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय मुलीच्या नात्यातील केळापूर तालुक्यातील अळणी या गावातील एक मुलगा. नात्यातील असल्याने त्याने या नात्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीशी सलगी वाढवली. मुलाने मग मुलीला वचन दिले. मी लग्न करील तर तुझ्याशीच.मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तीला या वचनातील कावा समजला नाही. तीही त्याच्या वचनात आकंठ बुडाली.
याच संधीचा फायदा घेत या युवकाने तीला लग्नाचे आमिष दाखवत तिची इच्छा नसतांना तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली.
मुलीच्या भावाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात कलम 64 (2 ) (M)65(1) बी एन एस सहकलंम 3(a)4,5,(j)(ii)5(L)6 बा. लै. अ. प्र का. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव व मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस करित आहे.
