मार्डी येथील रुग्णाला आवश्यकता आहे आर्थिक मदतीची
भास्कर राऊत मारेगाव
मार्डी, ता. मारेगाव, जी. यवतमाळ येथील एक होतकरू तरुण मंगेश गुरनुले.बांधकाम क्षेत्रात काम करीत होता.तब्येतीचा त्रास व्हायला लागला म्हणून दवाखाना केला.तर निदान झालेते किडनी फेलचे.
घरची परिस्थिती जेमतेम हलाखीची. मोलमजुरी करायचे आणि जीवन जगायचे. अशाप्रकारे दिवस कुंठीत असतांना किडनी फेलच्या निदानाने पायाखालची वाळूच सरकली .
किडनी फेल असल्याने दर आठवड्याला दवाखान्यात जावं लागते. त्यासाठी मोठा खर्च येत असतो. गुरनुले कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याने मंगेशच्या उपचारासाठी आणि त्याचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या मदतीची अत्यंत गरज आहे. आवश्यकता आहे आम्हाला आपल्या मदतीची.आर्थिक मदत करून मंगेशचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या हातभाराची गरज आहे.
मदतीसाठी संपर्क
9922885059
मंगेश गुरनुले
