पिसगाव ते पाथरी दरम्यान अपघात
भास्कर राऊत मारेगाव
समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने पिसगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते पाथरी दरम्यान दि. 31 मे 2025 रोज शनिवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मोहन जयराम पाचभाई, वय अंदाजे 54 वर्ष रा. पिसगाव ता.मारेगाव असे आहे.तर शामराव मालेकार रा.भालेवाडी असे गंभीर जखमी चे नाव आहे
मोहन पाचभाई हे काल सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे कामासाठी दुचाकीने मारेगाव येथे गेले होते.तेथील काम आटोपून ते सायंकाळी पीसगावकडे येत होते. त्याचवेळी भालेवाडी येथील मालेकर हे दुचाकीने मार्डी कडून मारेगावकडे जात होते.अशातच पिसगाव ते पाथरी दरम्यान रस्त्यात यांच्या दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्या.या अपघातात मोहन पाचभाई यांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच काही नागरिकांनी त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचारास दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील खासगी दवाखान्यात हलविले.परंतु तेथील डॉक्टरांनी मोहन यांना मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने पिसगाव येथे शोककळा पसरली. सदर घटनेचा तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.
