मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
भास्कर राऊत मारेगाव
काकूच्या सोबत तिच्या माहेरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. सदर घटनेची तक्रार मुलीच्या काकाने मारेगाव पोलीस स्टेशन येथे संशयिताविरुद्ध दाखल केली आहे.
तक्रारदार मारेगाव तालुक्यातील एका गावातील राहिवासी आहे. ते कामानिमित्त सध्या पुणे येथे राहत आहे.त्यांच्यासोबत त्यांची पुतणी ही सुद्धा राहून तेथे शिक्षण घेत होती.तक्रारदार व्यक्तीची पत्नी गरोदर असल्याने त्यांनी तीला तिच्या माहेरी आणून सोडले होते. सोबतच पुतणीचीही परीक्षा संपल्याने तीही काकूला मदत म्हणून काकूच्या माहेरी आलेली होती.
पत्नीचा दवाखाना करायचा असल्यामुळे मुलीचे काकासुद्धा हे गावाला आले होते. ते दि.23 एप्रिलला पती – पत्नी आणि सासूला घेऊन वणीला दवाखान्यात गेले. पुतणी आणि सासरे हे घरीच थांबलेले होते. सायंकाळी 5 वाजता दवाखाना आटोपून घरी परतले तेव्हा त्यांना पुतणी वय 16वर्षे 8 महिने 14 दिवस अशी घरी आढळून आली नाही. त्यांनी तीला सर्वत्र शोधले असता तिचा शोध लागला नाही.शेवटी गावातीलच एका महिलेने तुमची पुतणी ही गावातीलच एका तरुणाच्या गाडीवर बसून गेली असे सांगितले. यावरून अल्पवयीन मुलीच्या काकाने संशयित अर्जुन अशोक चव्हाण वय 20 याचे विरोधात मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.
