भास्कर राऊत मारेगाव
नुकत्याच झालेल्या वादळी अवकाळी पावसाने वणी तथा मारेगाव तालुक्यात थैमान माजवले होते. दिनांक 19 एप्रिलला शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांवरही अस्मानी संकट कोसळले. वीज, वादळ, वारा, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्यामध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडली. तसेच विद्युत खांब वाकले. त्याचा परिणाम म्हणून विद्युत तारा तुटून पडल्या. विद्युत प्रवाह खंडित झाला. शेतकऱ्यांचे मोटारपंप व घरगुती विद्युत् उपकरणांचे फार मोठे नुकसान झाले. त्याच्या भरपाई करिता जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक गौरीशंकर खुराणा व त्यांची टीम आक्रमक झाली.
मारेगाव तालुका पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून हा तालुका कुख्यात आहे. अस्मानी संकटांमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे खूप नुकसान झाले. शेतकऱ्यांना व विद्युत ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक गौरीशंकर खुराणा व त्यांच्या टीमने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. तिथं जाऊन वरिष्ठ अभियंता व अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडितांना त्वरीत नुकसान भरपाईची मागणी रेटून लावली.
त्या मागणीला दुजोरा देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता मारेगाव यांना आदेशित करून नुकसान भरपाईचे पत्र काढण्यात आले. मारेगाव तालुक्यातील विद्युत खंडित झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे व घरगुती,व्यावसायिक ग्राहकांचे नुकसान झाले असल्यास उपविभाग महावितरण कार्यालय मारेगाव येथे अर्ज करण्याचे आवाहन गौरीशंकर खुराणा यांनी केले.
००००००००००००००००००००
या मागणीला मिळणार का यश
°°°°°°°°°°°°°°°°°°′°°°°°°°°°°°°°°
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी शेतकरी तसेच घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी वीज कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केलेल्या या प्रयत्नांना यश मिळणार का? की पुन्हा वीज कार्यालयाकडून ग्रहकांना गाजरच दाखवले जाणार हे येणारा काळच सांगेल….
