भास्कर राऊत मारेगाव
भाचीला भेटून परत वणीकडे जात असतांना मार्डी – चिंचमंडळ दरम्यान अपघात होऊन एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 26 ऑक्टोबरला घडली. अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव निखिल वसंतराव वरघडे, रा. वणी असे सांगण्यात येत आहे.
वणी येथील निखिल वरघडे हे होंडा शाईन वाहन क्रमांक MH 32-AL-3020 ने आपल्या भाचीला भेटायला गेले होते. भाचीला भेटून ते परत वणीकडे येत असतांना चिंचमंडळ जवळ त्यांचा अपघात झाला. अपघातात निखिल हे जखमी झाले. त्यांना परिसरातील युवकांनी तातडीने मदत करीत त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.अपघात कशाने झाला हे अजूनही कळले नाही. अज्ञात वाहणाने धडक दिली की कशाने अपघात झाला हे अजूनही स्पष्ट नाही.
