मारेगाव तालुक्यातील घटना
विधी संघर्ष बालकास अटक
भास्कर राऊत मारेगाव
आई बाबा घरी नसताना गावात खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीवर विधी संघर्ष बालकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मारेगाव तालुक्यामध्ये दिनांक २मार्च २०२५ ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी १५ वर्षीय विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आलेली आहे.
मारेगाव तालुक्यातील एका गावात पीडीतेचे आई-वडील मोल मजुरी करून आपली आणि कुटुंबाची उपजीविका करीत होते. ते नेहमीप्रमाणे दिनांक २ मार्चला मोलमजुरीसाठी बाहेर गेलेले होते. त्यांची चार वर्षाची चिमुकली ही घरी आजी सोबत खेळत होती. अशातच गावातीलच आठव्या वर्गात शिकणारा एक पंधरा वर्षीय बालक तिला घेऊन जनावरांच्या गोठ्यामध्ये गेला. आणि तिचे वर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान चिमुकलीचे आई-वडील मोलमजुरी करून घरी परतले. त्यांना चिमुकली घरी न दिसल्याने तिचा सर्वत्र शोध केला.तेव्हा ती जनावरांच्या गोठ्यामध्ये विधी संघर्ष बालकासोबत आढळून आली. यावेळी विधी संघर्ष बालक तिथून पळाला.आई-वडिलांनी मुलीला घरी नेऊन तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला. ही गंभीर घटना ऐकताच आई-वडिलांच्या पायाखालील वाळू सरकली. घटनेनंतर लगेचच आई-वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे मारेगाव तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कलम ६५(२), ६४(२),३(ब),४,५(म), ६नुसार गुन्हे दाखल करून संशयित विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव वणी पोलीस करीत आहे.
