श्री गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव तालुका यांचे आयोजन
भास्कर राऊत मारेगाव
सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे युग प्रवर्तक,आध्यात्मिक तथा विज्ञाननिष्ठ आदर्श जीवन प्रणालीचे पुरस्कर्ते,मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 116 वी ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा दिनांक 3 एप्रिल 2025 रोज गुरुवारला मार्डी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव गमे सर्वाधिकार श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम,उद्घाटक पद्माकर ठाकरे जिल्हा सेवा अधिकारी यवतमाळ, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्ञानेश्वर मुळे, निर्वाचन सेवा अधिकारी, मारोतराव ठेंगणे, प्रचार प्रमुख यवतमाळ जिल्हा, विजयाताई दहेकर महिला जिल्हा सेवा अधिकारी तथा केंद्रीय कार्यकारी सदस्य श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, दिलीप डाखरे सेवा अधिकारी वणी तालुका तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहे.

यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचाराची धुरा सांभाळत ज्या गुरुदेव भक्तांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली अशा तालुक्यातील जेष्ठ प्रचारकांचा सन्मान सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 3 एप्रिलला पहाटे 5 वाजता परिसर स्वच्छता आणि 5:30 वाजता सामूहिक ध्यान व चिंतन मोरेश्वर चटकी,ग्रामसेवाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ चिंचमंडळ यांचे करणार आहेत. सकाळी 8 ते 10 श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम आणि 11 वाजता प्रमुख मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत. तरी होणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील सर्व गुरुदेव भक्तांनी तसेच सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव तालुका यांचे तर्फे करण्यात आलेले आहे.
