भास्कर राऊत मारेगाव
२ नोव्हेंबरला झालेल्या अपघातातील दोघांचा अखेर मृत्यू झाला असून एकाला उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे.
दि. २ नोव्हेंबरला पांडवदेवी येथील गोवर्धनपूजा बघायला मारेगाव तालुक्यातील चोपण येथील दोघे तर चंद्रपूर जिल्ह्यातील ओसरला, ता. मूल येथील एक असे तिघे जण दुचाकीने जात होते. तालुक्यातील खडकी फाट्यावर एका पिकअप वाहणाने यांच्या दुचाकीला कट मारल्याने यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. यात दोघे गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला होता. तिघांनाही मारेगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.
यातील संदीप बादलशाही कुडमेथे याचे उपचारादरम्यान दि.2 नोव्हेंबरलाच मृत्यू झाला तर रवींद्र हरिदास जोगी रा. चोपण याचाही खासगी दवाखाण्यामध्ये उपचारादरम्यान रात्री 12.30 च्या दरम्यान मृत्यू झाला. संदीपच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली तर रवींद्रच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. संदिपवर ओसरला येथे तर रवींद्र जोगीवर चोपण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
