मारेगाव पोलिसांनी केली आरोपीस अटक
भास्कर राऊत मारेगाव
नवरगाव येथे सामने पहावयास आलेली मुलगी नळावर पाणी पिण्यास गेली असता एका युवकाने तिचा हात पकडून छेडखानी केली. सदर घटनेची मुलीने मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार करताच मारेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.
मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील पंचशील विद्यालय येथे क्रीडा सामने सुरू आहेत. नवरगाव केंद्रातील अनेक शाळा तेथे सहभागी झालेल्या आहेत. हे सामने बघण्यासाठी सदर मुलगीही नवरगाव येथे गेलेली होती. तिथे सगणापुर येथील आशिष रमेश धानोरकर वय 19 हा सुद्धा गेलेला होता.पीडित मुलगी सामने बघून पाणी पिण्यासाठी नळावर गेली असता आशिष रमेश धानोरकर हा सुद्धा नळावर गेला आणि तिचा हात पकडून तू माझ्याशी बोलत का नाहीस, तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझी इज्जत चारचौघात काढीन अशी धमकी दिली.
यापूर्वी सुद्धा आरोपीने सदर मुलीची छेडखानी काढलेली होती.घडलेला प्रकार पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या भावास सांगितला.भावाने दि. १९ डिसेंबर ला मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आशिष धानोरकरविरुद्ध कलम ७४, ७५, ७८,BNS सहकलम ८, १२,बा. लै.अ.प्र.सहकलम ३(१)W(i), कलम 3(1)(W) (ii)3(2)(va)अ. जा. ज. अ. प्र. का.नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
