सततच्या घटनेने परिसरात खळबळ
भास्कर राऊत मारेगाव
घरातील कचरा झाडून खातावर फेकून घरी परतत असलेल्या एका युवतीचा गावातीलच पन्नास वर्षीय नराधमाने विनयभंग केला. सदर घटना ही तालुक्यातील खंडणी येथे घडली.वृत्त लिहिपर्यंत नराधमाला अटक व्हायची होती.
तालुक्यातील खंडणी येथील एक युवती ही दुपारी चार वाजताच्या दरम्यान घराची झाडझूड करीत होती. झाडझूड झाल्यानंतर ती झाडलेला कचरा फेकायला गेली. कचरा फेकून घरी परतत असतांना आरोपी उत्तम किसन ठाकरे वय ५० वर्षे याने या युवतीला वाईट उद्देशाने पकडले.
तसेच केसं पकडून ओढले. या झटापटीत युवतीच्या उजव्या डोळ्याच्या खाली खरचटले.माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्या बरोबर युवतीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत सदर घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी कलम ७४ भा. न्या. सं. नुसार गुन्हा नोंद केला असून वृत्त लिहिपर्यंत आरोपीस अटक झालेली नव्हती. घटनेचा तपास ठाणेदार संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय. दत्तू किनाके करीत आहे.
