भास्कर राऊत मारेगाव
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “शंभर दिवस मोहीम” या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी अंतर्गत उपकेंद्र चोपण येथे दि. 3 मार्चला क्षयरोग जनजागृती करण्यासाठी टीबी विषयी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
क्षयरोग समूळ नष्ट व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत “100 दिवस” राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या चोपण येथे हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे,चोपण येथील सरपंच शारदा संजय गोहोकर, प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथील वैद्यकीय अधिकारी चेतन पाऊणकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळा चोपण येथील विद्यार्थिनींनी क्षयरोग निर्मूलनावर आधारित रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोपण येथील समुदाय आरोग्य अधिकारी पराग नगराळे, आरोग्य सेविका प्रियंका निकुरे, आरोग्य सेवक रामलाल मेश्राम, तसेच अंगणवाडी सेविका, उपकेंद्रातील माया धोंगडे, पुष्पा अहिरकर, सीमा दाते, सुशीला नैताम, रुख्मा उईके या आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
