सूरज पत्रकार राळेगाव
दि. २९-०३-२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा निधा, ता. राळेगाव येथे शुअरटेक हाॅस्पिटल ऍन्ड रिसर्च सेंटर लि. कार्डीओलाजी पोलिट्रामा सुपर स्पेशालिस्ट युनिट जामठा व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण यवतमाळ आणि ग्रामपंचायत निधा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ह्रदयरोग चिकीत्सा,ह्रदय शस्त्रक्रिया,एक्सिडेंट ट्रीटमेंट,जाॅइंटस रिप्लेसमेंट,इंटरव्हेन्शनल कार्डीयोलाॅजी, इंटरव्हेन्शनल रेडियोलाॅजी या सर्व तपासण्या शिबिरामध्ये घेण्यात आल्या.यावेळी २३७ इतक्या रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली.
सदर कार्यक्रमात डॉ. विरेंद्रसिंग बावा,डाॅ.निलेश वाडीभस्मे, डॉ.उर्मिला धनके,डॉ.सोनल फाळके व नागपूर येथील तज्ञ डॉक्टराची टीम जनसेवा प्रतिष्ठान तालुका समन्वयक शितल नरडवार,क्लस्टर काॅडिनेटर सुनंदा पुडके,लता झोटिंग,मयुर वटाने तसेच ग्रामपंचायत सरपंच रेखाताई ठमके,रूपा आडे, कविता धुर्वे , उपसरपंच राजु मेश्राम, पोलीस पाटील राहुल पत्रकार,प्रतिष्ठित नागरीक ज्ञानेश्वर मुडे, रवीभाऊ आडे (माजी सरपंच )ज्ञानदीप राऊत, सुरज पत्रकार तसेच उमेद कॅडर ग्राम संघ गावातील पदाधिकारी व युवा वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
