मारेगाव तालुक्यात एका शेतकरी पुत्राची आत्महत्या तर एकाचा मृतदेह आढळला नाल्याच्या काठावर
भास्कर राऊत मारेगाव
उद्या तुम्ही माझ्या मयतीला या असा आपल्या भाऊजीला फोन करून एका शेतकरी पुत्राने गावाजवळील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. गोपाल मधुकर ठाकरे वय 36 असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील राहिवासी होता.
तर दुसरी घटना वनोजादेवी येथील एका व्यक्तीचा मृतदेह नाल्याच्या काठावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सविस्तर वृत्त असे की, मांगरूळ येथील गोपाल ठाकरे यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. गोपाल हा वडिलांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करीत होता. तसेच स्टाईलचे मिस्त्री काम करत होता.
दि. 21 डिसेंबरला गोपालने राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे राहणारे त्याचे भाऊजी भारत जिकार यांना फोन केला. त्यात तुम्ही उद्या माझ्या मयतीला या असे सांगितले.रात्री फोन केला असता त्याचा फोन पुन्हा लागला नाही. रात्रभर गायब असलेल्या गोपालचा मृतदेह 3 वाजताच्या सुमारास गावाजवळील विहिरीत असल्याचे आढळून आले.गोपालच्या नातेवाईकांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मृतक गोपाल यांचे पश्चात आई, वडील, पत्नी ,मुलगी व चार विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय साळुंके यांचे मार्गर्शनाखाली ए एस आय किसन संकुरवार करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत वनोजादेवी येथील रंगनाथ बापूजी बरडे वय 64 यांचा मृतदेह स्मशानभूमीजवळ नाल्याच्या काठावर पडून असलेले दिसले. त्यांच्या तोंडावर फेस आलेला होता. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांची आत्महत्या आहे की घातपात याचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
