पुसट झालेल्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
भास्कर राऊत मारेगाव
सर्व मित्र बारावी पास झाले आणि पुढील शिक्षणासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे झाले. पुढचं करिअर सुरु झालं आणि हळूहळू सर्व आपपल्या क्षेत्रात गुंतत गेले. मध्यंतरी बराच कालावधी लोटला.दरम्यान जुन्या आठवणी पुसट होत गेल्या. दरम्यान एका वर्गात शिकणारे रोजीना अडतीया, सुरेश नाखले बद्रीप्रसाद दुपारे यांनी पुढाकार घेत शहरातील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९९२-९३ ला बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांचा ३२ वर्षानंतर एकत्र येत स्नेहमीलनाचा कार्यक्रम १५ फेब्रुवारीला मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे पार पाडला.

स्नेहमीलन कार्यक्रमकरिता अमेरिकेत वास्तव्य करणारी रोजीना अडतीया हिने उपस्थिती दर्शविली. 1992-93 ला मारेगाव येथील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या वर्गमित्रांची 32 वर्षानंतर भेट होत असल्याने सर्वांनी आपला जीवन परिचय देत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
कला वाणिज्य कानिष्ठ विद्यालायचे मित्र विखुरलेल्या पाखराप्रमाणे तब्बल 32 वर्षानंतर पांढरदेवी या ठिकाणी एकत्र आले अन जमलेल्या मैत्रीचा एका कोपऱ्याने शालेय मित्रांची पुन्हा वीन घट्ट झाली.या स्नेहमीलन कार्यक्रमात रोजीना अडतीया (विराणी ), इंदू येरगुडे (मत्ते ), प्रेमलता चिकटे (थुल ), संगीता पुनवटकर (हस्ते), मेघा महाजन (डेहनीकर ), सुमित्रा तोडसाम (जुमनाके ), गीता आवारी, कल्पना झाडे (पारखी), वर्षा निमसटकर (मेश्राम ) तसेच बद्रीप्रसाद दुपारे, शरद खापणे, सुरेश नाखले, संतोष आस्वले, विजय बोबडे, गजानन आस्वले, प्रकाश बावणे, राजकुमार पाटील, मोरेश्वर काकडे, सहभागी झाले होते.
