भास्कर राऊत मारेगाव
मार्डी येथील जय भवानी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गा देवीचे विसर्जन शांततेत पार पडले. हजारो युवक,युवती, स्त्री-पुरुष देवीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या दुर्गा देवीचे मिरवणुकीने मार्डी तसेच परिसरातील नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
मार्डी येथील झेंडा चौकामध्ये जय भवानी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे दुर्गादेवीची स्थापना केली जाते. यावर्षी या जय भवानी दुर्गा उत्सव मंडळाने दुर्गा देवी स्थापनेची वीस वर्षे पूर्ण केली.
मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरला दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक निघाली.या मिरवणुकीमध्ये हजारो युवक, युवती, स्त्री- पुरुष सहभागी झाले होते. डोळ्याचे पारणे फेडणारे नयनरम्य वाद्य तसेच ढोल ताशाच्या गजरामध्ये निघालेल्या मिरवणुकीने मार्डी तसेच परिसरातील नागरिकांना बेधुंद करून टाकले. अनेक युवक, युवती, स्त्री – पुरुष, म्हातारे वयाचा विचार न करता या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. वाद्याच्या तालावर अनेकांचे पाय थिरकत होते. दुर्गादेवीच्या मिरवणुकीचा आस्वाद घेणारे अफाट नागरिक होते. तरीही ही विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात मंडळाच्या युवकांनी सहकार्य केले. या मिरवणुकीत कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार घडू नये यासाठी मंडळाच्या युवकांनी केलेल्या कार्याबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केल्या जात आहे.
