भास्कर राऊत मारेगाव
दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत सगळीकडे मोठ्या उत्साहात केले जाते. जगात नवीन वर्षाचे स्वागत धूमधामपणे केले जाते. असेच नवीन वर्षाचे स्वागत आदर्श हायस्कूल मार्डी येथे करण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य रमेश ढूमणे, ज्येष्ठ शिक्षक अनंता शिवरकर, जगन भोंगळे, भास्कर राऊत, नितु मेश्राम, एकनाथ येटी, ज्ञानेश्वर दातारकर उपस्थित होते.
येथील विद्यार्थ्यांनी यावेळी आपापल्या वर्गखोल्यांची सुंदर अशी सजावट केलेली होती. यावेळी नवीन वर्षाचे केक कापून स्वागत केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत आपले मनोगत व्यक्त करून केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आचल खैरे हिने गीत सादर करून सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे संचालन गौरी देवाळकर, प्रास्ताविक निशा इरपाते, आभार प्रदर्शन आचल खैरे हिने मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
