कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
भास्कर राऊत मारेगाव
संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मारेगाव येथे करण्यात आलेले आहे. हे आयोजन दि.11 मार्चला मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणावर करण्यात आलेले आहे.

मारेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 मार्चला नगरपंचायतच्या प्रांगणावर सायंकाळी 6 वाजता या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कीर्तनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव, तालुका जनहित कल्याण संघटना मारेगाव आणि जनहित कल्याण महिला संघटना मारेगाव यांनी केलेले आहे.
