खैरी जवळील शनी मंदिर येथे जात होते दर्शनाला
भास्कर राऊत मारेगाव
खैरी जवळील शनी मंदिर येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांचा ऑटो मार्डी जवळील बामर्डा फाट्याजवळ पलटला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी असून त्यातील एकीला चंद्रपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे. मृत झालेल्या महिलेचे नाव शोभा पत्रू दारुणकर वय 65 असे आहे.
मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील येसेकर कुटुंबाचा राळेगाव तालुक्यातील खैरी जवळील शनी मंदिर येथे स्वयंपाक होता. त्यासाठी येसेकर कुटुंबाने गावातीलच ऑटो भाड्याने केला होता. त्या ऑटोमध्ये गावातीलच काही महिला आणि छोटे मुलं असे सगळे शनी मंदिर येथे जात होते. ऑटो रस्त्याने जात असताना मार्डी जवळील बामर्डा फाट्याजवळ खड्डा चुकविण्याच्या नादात ऑटो पलटी झाला. यात शोभा पत्रू दारुणकर वय 65 वर्ष या ऑटो खाली दबल्या गेल्या तर दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या. जखमी सगळ्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शोभा दारूनकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर माया तुकाराम कडुकर वय 55 वर्षआणि जिजा रमेश येसेकर वय 40 वर्ष या गंभीर जखमी झाल्या. या दोघींवर वणी येथे उपचार सुरू होते. यातील एकीला चंद्रपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे.
मार्डी जवळ बामर्डा येथे झालेल्या अपघाताची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा जखमीना उपचारार्थ वणी येथे पाठवले.
