भास्कर राऊत मारेगाव
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा जवळील खोरद येथील तलावात धुलिवंदनाच्या दिवशी दोन तरुणांचा बुडून करून अंत झाला.या दुर्दैवी घटनेत मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील जयंत पंढरी धानफुले या 28 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला.
कळंब तालुक्यातील खोरद येथे पाहुणपणा म्हणून गेलेल्या जयंतने आपल्या नातेवाईकांसह रंगाची होळी खेळली व त्यानंतर तलावात आंघोळ करण्याकरिता गेले. पाण्यात उतरलेले पाचही जण बुडू लागले. मात्र तलावाजवळ असलेल्या मासेमारांना तिघांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. परंतु राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील पंकज झाडे व मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील जयंता धानफुले यांचा पाण्यामध्ये बुडून करुण अंत झाला. जयंतच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी असा आप्तपरिवार आहे. मृतक जयंतचा अंत्यविधी मार्डी येथील मोक्षधामात 15 मार्चला दुपारी चार वाजता पार पडला.
