शिवजयंतीच्या पर्वावर दाखविण्यात येणार छावा चित्रपट
भास्कर राऊत मारेगाव
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार दिनांक 17 मार्चला जयंती आहे.या जयंतीचे निमित्त साधून हिवरा (मजरा) तालुका मारेगाव येथील शिवसेना शाखेतर्फे छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडे 19 फेब्रुवारीला धूमधामपणे साजरी होत असते. परंतु अनेक ठिकाणी तिथीनुसारही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. अशातच मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंतीच्या निमित्ताने सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेला छावा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी हिवरा येथे मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन पुरुषोत्तम बुटे,अनंता निब्रड, विठ्ठल गाडगे, अभय भोयर, प्रसाद ठावरी, दिलीप कोडापे, प्रशांत गेडाम, कुणाल काळे, पंकज ताजने यांनी केले आहे.
