चोपण येथील मोक्षभूमीत 4 वाजता होणार अंत्यविधी
भास्कर राऊत मारेगाव
जिल्हा परिषद शाळा चोपण येथील निवृत्त मुख्याध्यापक कर्णूजी भोंगळे यांचे आज दि. 19 मार्चला निधन झाले.मृत्यू समयी ते 85 वर्षाचे होते.
जी. प. शाळा चोपण येथून 1998 ला श्री. कर्णूजी भोंगळे हे निवृत्त झाले होते.काही दिवसापूर्वी ते घरी घसरून पडले होते. त्यांचेवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये कसलीही सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी अखेर त्यांना घरी नेण्यास सांगितले. दि. 19 मार्चला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान श्री. कर्णूजी भोंगळे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचेवर चोपण येथील मोक्षधाम येथे सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन सुना, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
