ऑफलाईन सोबत ऑनलाइनचेही नागरिकांना वेड
विद्यार्थीही वळताहेत मटका व्यवसायाकडे
भास्कर राऊत मारेगाव
मारेगाव शहरात सध्या मटका जोरात सुरू आहे.ऑफलाइन मटक्यासोबतच ऑनलाईन मटका सुद्धा सुरू आहे. या ऑनलाइन मटक्याकडे विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने वळले जात असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खिसा रिकामा होत असल्याचे चित्र मारेगाव तालुक्यात दिसून येत आहे.
मटका,नागरिकांना झटपट श्रीमंत बणण्याचे स्वप्न दाखवून नागरिकांची पूर्णपणे लूट करणारा व्यवसाय. मारेगाव एक शहराचे ठिकाण तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तहसील, पंचायत समिती किंवा इतर कार्यालयामध्ये नागरिक नेहमीच भेट देत असतात. अशातच यातील काही नागरिक तसेच मारेगाव शहरात असणारे काही नागरिक या अवैध व्यवसाय गणल्या जाणाऱ्या मटक्याकडे साहजिकच वळले जात आहे. शासकीय किंवा इतर कामासाठी आणलेला पैसा मग हा मटका या व्यवसायामध्ये लावला जातो. यात जवळचेही जातात आणि आणि मटका लागत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फरपट होत असते.
मटका या अवैध व्यवसायाला आळा बसावा म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षांनी निवेदने दिलेली होती. परंतु हे निवेदन दिल्यानंतरही मटका किंग एवढे मुजोर बनले आहेत की मटका बंद न करता उलट खुले आमपणे सर्रास चौकात मटका व्यवसाय सुरू ठेवत असल्याचे नागरिक सांगत आहे.
ऑफलाइन मटक्यासोबतच ऑनलाइन मटका सुद्धा जोरात सुरू असून हा मटका मोबाईल वरच लावल्या जात असल्याने कोणाच्या लक्षातही ही बाब येत नाही. याकडे श्रीमंत तसेच गरिबांसोबतच विद्यार्थीही वळल्या जात असल्याने या अवैध असलेल्या मटक्याला प्रतिबंध घालावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
