दोन तरुण गंभीर, यवतमाळ येथे उपचार सुरु
भास्कर राऊत मारेगाव
भरधाव असणाऱ्या अज्ञात वाहणाने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करंजी येथे करून पुढील उपचारासाठी पांढरकवडा नंतर यवतमाळ येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. सदर घटना दि. 29 मार्चला सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली.जखमी झालेल्या युवकांचे नाव सतीश झिंगू आत्राम, वय 35 आणि निलेश तुकाराम टेकाम वय 21 दोघेही राहणार वागदरा ( वसंतनगर )असे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वागदरा येथील सतीश आणि निलेश दोघेही काही कामानिमित्त घोगुलदरा येथे गेले होते अशी माहिती आहे. काम आटोपून ते गावाला परत यायला निघाले. तेव्हा घोगुलदरा फाट्याजवळ वणीकडून येणाऱ्या कथ्या रंगाच्या कारने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकी अक्षरशः तीनशे ते चारशे मीटर फरफटत नेली असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.बोटोनी जवळ असलेल्या गतिरोधकाजवळ दुचाकी कार मधून वेगळी झाली आणि अज्ञात कार चालक कार घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन्ही गंभीर जखमी तरुणांची प्रकृती चिंताजनक असून दोन्हीही जखमी तरुणांना करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले असता त्यांचेवर प्राथमिक उपचार करून तालुका आरोग्य केंद्र पांढरकवडा आणि नंतर यवतमाळ येथे उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. सदर प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
