युवा ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
सुरज पत्रकार राळेगाव
घरकुल लाभार्थी तसेच विहिरीच्या बांधकामासाठी आणि खाजगी बांधकामाकरीता रेती त्वरित उपलब्ध करून द्या,अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघाने दि. 25 मार्चला उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांना दिलेले आहे.

तालुक्यातील घरकुल लाभार्थी तसेच विहिरीचे लाभार्थी यांना घरकुल आणि विहिरी मंजूर झालेल्या आहेत. घरकुल मंजूर झाले परंतु घरकुल बांधण्याकरता रेती मात्र कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे ही अपूर्ण अवस्थेत आहे. काही लाभार्थ्यांनी आपले घर खोलून दुसरीकडे किरायाने वास्तव्य करीत आहेत. तसेच काही गरीब लाभार्थी बाजूला साधी झोपडी करून राहत आहेत.

रेती अभावी अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. सुरू केलेले कामे तसेच पडून आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना तसेच विहिरीच्या आणि खाजगी काम करणाऱ्या लाभार्थ्यांना त्वरित रेती उपलब्ध करून द्या. अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा असा इशारा युवा ग्रामीण पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिलेला आहे. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, सचिव शशीम कांबळे, उपाध्यक्ष लोकेश दिवे, संघटक गोपीचंद ढाले, कोषाध्यक्ष असलम पठाण, प्रसिद्ध प्रमुख अरविंद कोडापे, सदस्य कैलास कोडापे, शंकर पंधरे,रजत चांदेकर, जगदीश गोबाडे, सुरज ढाले, जितेंद्र खोडे, बंडु भारसकरे, महादेव टेकाम, सुरज पत्रकार उपस्थित होते.
