भास्कर राऊत मारेगाव
अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने मारेगाव येथे कलावंत मार्गदर्शन मेळाव्याचे दि. 11 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलेले आहे. या कलावंत मार्गदर्शन मेळाव्यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय दरेकर यांचा सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष मारोती ठावरी राहणार असून प्रमुख अतिथी मध्ये शाम खंडारे, अ. भा. कलावंत न्याय हक्क समिती राष्ट्रीय महासचिव, मनोहर सहारे,सिद्धार्थ भवरे, अविनाश बन्सोड,मारोती ठेंगणे, अरुणाताई खंडाळकर, अनिल दरेकर, मनीष मस्की, सुनील देऊळकर, किसन मत्ते, गंगाधर घोटेकर, गंगाधर लोणसावळे, रामदास आत्राम उपस्थित राहणार आहे.
कलावंतामध्ये जागृती होऊन कलावंतांचे संघटन व्हावे व त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत 2022 पासून प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे, कलावंतांना मोफत प्रवास कार्ड मिळणे, कलावंतांना घरकुल मिळणे, वारकरी व सर्व तऱ्हेच्या भजन मंडळ, सांस्कृतिक भजन मंडळांना साहित्य मिळणे, जिल्हा कलावंतांना निवड समितीमध्ये मारेगाव न्याय हक्क समितीच्या सदस्यांची निवड करणे व इतर विषयावर त्यांचे हक्क त्यांना कुठलेही अडी अडचणी न येता मिळाव्यात या उद्देशाने या कलावंत मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी वारकरी भजन,खंजिरी भजन, दिंडी भजन, पदावली भजन तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, नकलाकार तथा इतर सांस्कृतिक मंडळातील कलावंत यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अ. भा. न्याय हक्क समिती तालुका शाखा मालेगाव च्या वतीने करण्यात आलेले आहे.
