वयाच्या 72 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
भास्कर राऊत मारेगाव
मारेगाव येथून जवळच असलेल्या कोलगाव येथील प्रतिष्ठित श्री. जनार्धन दादाजी बेहरे, वय 72 वर्ष यांचे दि. 17 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते मागील दोन महिन्यापासून आजारी होते.
जनार्धन दादाजी बेहरे यांची दोन्ही मुले नितीन जनार्धन बेहरे व प्रवीण जनार्धन बेहरे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जनार्दन बेहरे यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना,नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर उद्या दि. 18 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता कोलगाव येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
