विषारी कीटकनाशक घेऊन संपविले जीवन
तालुक्यातील कोलगाव येथील घटना
भास्कर राऊत मारेगाव
निरस जीवनाला कंटाळलेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दि. १५ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास घडली. विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल अरविंद अवताडे, वय अंदाजे २८ आहे.
विशाल अरविंद अवताडे या तरुण शेतकऱ्याचे नावाने ३ एकर शेती असल्याची माहिती आहे. त्याने काल दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोज मंगळवारला सायंकाळच्या सुमारास घरासमोरील जनावराच्या गोठ्यात विषारी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबियांनाही ही बाब रात्री ८ वाजताच्या दरम्यान लक्षात आली.

कुटुंबातील सदस्यांनी त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. पण उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
मृतक विशाल याचे पश्चात आई,वडील, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे.मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
