भास्कर राऊत मारेगाव
दि. १२ नोव्हेंबरला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मारेगाव तालुक्यात प्रचाराचा झंझावात घोंगावणार आहे. दिवसभर मारेगाव तालुक्यात त्यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून अनेक ठिकाणी कॉर्नर सभाही आयोजित केल्या गेलेल्या आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचाराच्या माध्यमातून गाव आणि गाव पिंजून टाकत आहे.त्यांनी आपल्या प्रचाराचा भर हा डोअर टू डोअर ठेवला असून यासाठी ते सकाळपासूनच प्रचाराला लागतात.
सकाळी ७. ३०ला मंगरूळपासून प्रचाराला सुरुवात होणार असून नंतर कोलगाव, वेगाव, १०. ३०ला केगांव, गोधणी, हिवरी असा मार्ग आहे.दुपारी २ वाजता नवरगाव, ३ वाजता करणवाडी,4 वाजता मारेगाव येथे भेट. त्यानंतर बुरांडा, हटवांजरी, भुरकी पोड,सायंकाळी ७. ३० वाजता खंडणी, मेंढणी,९ वाजता सराटी आणि १० वाजता बोटोनी येथे दिवसाचा समारोप होणार आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या प्रचार दौऱ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.
