भास्कर राऊत मारेगाव
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा आज मार्डी आणि कुंभा सर्कल मध्ये प्रचाराचा झंझावात असणार आहे. अनेक गावांना भेटी देत ते जनतेशी संवाद सुद्धा साधणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर आज सकाळी गौराळा येथून वनोजादेवीकडे प्रस्थान करणार आहेत. वनोजादेवी वरून ते हिवरा, कानडा,शिवनी, पारडी, चोपण या गावांना भेटी देऊन दुपारी २ वाजता मार्डी येथे भेट असा त्यांचा प्रचाराचा झंजावात राहणार आहे. या दरम्यान ते अनेक नागरिकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत.
दुपारी अडीच वाजता मार्डीवरून ते खैरगाव, चिंचमंडळ, कोथुर्ला,बोरी मार्गे साडेचार वाजता ते कुंभा येथे पोहोचणार आहेत. कुंभा गावाला भेटी देऊन त्यानंतर ते धरमपूर, घोगूलधरा तर संध्याकाळी सहा वाजता बोटणीमध्ये त्यांची प्रचार फेरी निघणार आहेत.
सायंकाळी साडेसहा वाजता वागदरा, वसंतनगर, सराटी, खैरगाव या गावांना भेटी देऊन रात्री दहा वाजता म्हैसदोडका येथे त्यांच्या दिवसाच्या प्रचाराची सांगता होणार आहेत. या प्रचार सभेमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाने तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
