भैय्याजी कनाके मारेगाव
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दरेकर यांच्या वणी आणि मारेगाव येथील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे पारडे जड वाटत असून संजय देरकर यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.
वणी विधानसभेची निवडणूक रंगात आलेली आहे. प्रत्येक उमेदवार आपला विजय व्हावा यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. मतदान अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेले आहेत. प्रत्येक उमेदवार प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर देत आहेत.
दिनांक 17 नोव्हेंबरला संजय दरेकर यांची वणीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला मिळालेला जनतेचा उदंड प्रतिसाद पाहून वणी विधानसभेत संजय देरकर बाजी मारणार असेच वातावरण निर्माण झालेले आहे.
असाच प्रतिसाद मारेगाव येथील पदयात्रेत पहायला मिळाला. यावेळी संजय देरकर यांनी महाविकास आघाडीला मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित
