आदर्श हायस्कूल मार्डी येथे सुरु आहे योग शिक्षण
भास्कर राऊत मारेगाव
शरीरासोबत बुद्धी आणि मन सुद्धा सुदृढ झाले पाहिजे.यासाठी योगाची गरज असते. आणि हेच योगा शिक्षण आदर्श हायस्कूल मार्डी येथील विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विद्यार्थीही मोठ्या आनंदाने योग शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे चित्र आदर्श हायस्कूल मार्डी येथे दिसून येत आहे.

योग गुरु श्री श्री रविशंकर यांचे अनेक ठिकाणी आर्ट ऑफ लिविंग चे क्लासेस सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आदर्श हायस्कूल मार्डी येथेही आर्ट ऑफ लिविंग चे क्लासेस विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे. यात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढावी, तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी हा योगा केला जातो.आदर्श हायस्कूल मार्डी येथे विद्यार्थ्यांसाठी दररोज योगाचे आयोजन केले जाते.

योगा प्रशिक्षक श्री अरुण बोबडे यांनी सुरुवातीला आदर्श हायस्कूल येथील शिक्षकांचे योगा क्लासेस घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर आदर्श हायस्कूल मार्डी येथे सुद्धा त्यांनी आणि नागपूर येथील महिला प्रशिक्षिका प्रतिभा शेट्टी यांनीही विद्यार्थ्यांना मार्डी येथे येऊन प्रशिक्षण दिले.आता विद्यार्थी स्वतः हे योगाचे धडे गिरवताना दिसून येत आहेत.योगा करण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे.
