भास्कर राऊत मारेगाव
विदर्भाची पंढरी समजली जाणारी चंद्रपूर जिल्ह्यातील वढा (जुगाद)या गावी कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा भरली.या यात्रेमध्ये पवित्र अशा संगमावर पवित्र अंघोळ करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळलेली होती.
वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस जवळील वढा (जुगाद) हे तीर्थक्षेत्र.येथे पुरातन असे विठ्ठल रुखमाई मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर तसेच हनुमान मंदिरही आहे.येथील मंदिरात चैतन्य महाराज यांचे वास्तव्य लाभलेले आहे.या तीर्थक्षेत्री दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरत असते. पुरातन काळापासून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी वर्षभर पवित्र संगमावर वेगवेगळे विधी तसेच कार्यक्रम सुरु असतात.
वढा येथील यात्रेमध्ये विदर्भ तसेच जवळील तेलंगना आणि आंध्र प्रदेश येथूनही भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शन तसेच पवित्र स्नानासाठी येत असतात.सोबतच छट पूजासुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते.
