भास्कर राऊत मारेगाव
मार्डी परिसरामध्ये आयडियाचे अनेक ग्राहक आहेत. परंतु आयडियाची सेवा मात्र सुरळीत नसल्याने अनेक आयडिया सिम धारक ग्राहक त्रस्त झालेले आहेत. याविषयी तक्रार करणाऱ्या तक्रारदारांचे फोनच उचलत नसल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यामध्ये आयडियाचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे. खेड्यापाड्यात सुद्धा आयडिया नेटवर्क पसरलेलं असून त्या माध्यमातून आयडियाची सेवा दिल्या जात होती. परंतु मागील काही महिन्यांपासून आयडियाच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम यायला लागलेले आहे.त्यामुळे आयडिया सेवा धारण करणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरामध्ये मार्डी येथे आयडियाचे टॉवर आहेत.परंतु मार्डीवरून दोन किलोमीटरवर असलेल्या सभोवतालच्या गावांमध्ये आयडियाचे नेटवर्क कोणत्याही प्रकारचं काम करत नाही. त्यामुळे आयडियाचे ग्राहक संताप व्यक्त करीत आहे. याविषयी तक्रार करायला फोन केला असता साधा फोन सुद्धा आयडिया कंपनीच्या व्यक्तीकडून उचलल्या जात नाही. त्यामुळे आयडियाचं सिम वापरत असलेले ग्राहक सिम पोर्टच्या तयारीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
============================
आम्ही मागील अनेक वर्षांपासून आयडिया सिम वापरत आहोत. सुरुवातीला आयडियाची सेवा आयडिया कंपनी छान देत होती. परंतु मागील काही महिन्यांपासून आयडिया टॉवर परिसरामध्ये काम करतच नसल्याने आयडिया ची सेवा पूर्णपणे कोलमडलेली आहे.त्यामुळे आम्हाला साधा कॉल जरी करायचा असला तरी घराचे बाहेर जाऊन कॉल करावा लागत असल्याने नाहक त्रास होत आहे. याविषयी आम्ही तक्रार करायला फोन केल्यास आमच्या फोनची साधी दखलही घेतल्या जात नाही किंवा फोन सुद्धा उचलला जात नाही.
सौ. माया राऊत, तक्रारदार चोपण
===================================
