भास्कर राऊत मारेगाव
अंगणामध्ये बसून असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील रोहपट येथे घडली. महिलेने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेतालुक्यातील रोहपट येथील ६० वर्षीय महिला दि. २३ डिसेंबरला रात्री ८ वाजताचे दरम्यान आपल्या घरासमोरील अंगणात बसलेली होती.
त्यावेळी गावातीलच बबन चंडकू रामपुरे वय ५० याने फिर्यादी महिलेच्या पुतण्याचे घराचा दरवाजा ठोठावला. सदर महिलेने त्यास हटकले असता त्याने सरळ महिलेच्या अंगणात येऊन महिलेचा विनयभंग केला.यावेळी महिलेने आरडाओरड केली. घटनेच्या दिवशी रात्री उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी दि. २४ डिसेंबरला महिलेने पोलीस ठाणे गाठत विनायभंगाची तक्रार दाखल केली.
सदर घटनेची तक्रार दाखल होताच मारेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनात पो. हे. कॉ. दत्तू किनाके करीत आहे.
