भास्कर राऊत मारेगाव
मार्डी येथे भव्य शिव महापुराण कथा मागील दि. २२ डिसेंबरपासून सुरु आहे. या शिव महापुराण कथेवेळी येणाऱ्या भाविकांना काही त्रास झाल्यास अथवा कोणताही आजार उद्भवल्यास डॉ. किशोर कोटेचा यांचेकडून मोफत उपचार सुरु असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. किशोर कोटेचा, मार्डी येथील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व. मागील अनेक वर्षांपासून ते मार्डी येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे.वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांसोबतच इतर सामाजिक उपक्रमात सुद्धा अनेकवेळा त्यांनी सहभाग दर्शवीला आहे.
मार्डी येथे दि. २२ डिसेंबरपासून शिव महापुराण सुरु आहे. शिव महापुराणला ऐकण्यासाठी मार्डी तसेच परिसरातील भाविकगण मोठ्या संख्येने मार्डी येथे येत आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत ही शिव महापुराण कथा असते. ही कथा ऐकण्यासाठी भाविकगण येत असतांना यातील काहींना कोणत्याही प्रकारचा जर त्रास व्हायला लागला तर त्या रुग्णाची डॉ. किशोर कोटेचा हे मोफत सेवा करीत आहे. यात इंजेक्शन लावण्यापासून ते सलाईन लावण्यापर्यंतची मोफत सेवा रुग्णांची करीत असतात. यावेळी त्यांचे खासगी सुरु असलेले क्लिनिक ते काही वेळ बंद ठेऊन या ठिकाणी सेवा पुरवीत असल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
