दोघांचे मृत्यूने परिसरात हळहळ
भास्कर राऊत मारेगाव
दिनांक ७ जानेवारीला निंबाळा फाट्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही मित्रांनी नागपूर येथे उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. एकाच वेळी एकाच गावातील दोघा मित्रांनी अखेरचा श्वास घेतल्याने पहापळ सोबतच संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे.
वणीवरून आपले काम आटोपून पहापळ येथे परत येत असताना पहापळ येथील विजय संभाजी थेरे ३५ नितीन खुशाल पायघन २८ या दोन मित्रांच्या MH ३१ हा ३४० या हिरो होंडा दुचाकीचा दि. ७ जानेवारीला निंबाळा फाट्याजवळ जनावर आडवे आल्याने अपघात झाला होता. या अपघातात विजय आणि नितीन दोघेही गंभीर जखमी झाले होते.
या दोघांनाही नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दोघांनीही शनिवारी अखेरचा श्वास घेतला.एकाच गावातील दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे पहापळ सोबतच अख्या तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. यातील विजय थेरे याला एक मुलगी असून नितीन पायघन हा अविवाहित होता.दोघांवर शनिवारी पहापळ येथे अंत्यविधी करण्यात आला.
