सरस्वती माध्यमिक विद्यालय बाळापूर (बोपापुर) येथील मुख्याध्यापिका सोनल पिंपळकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
भैय्याजी कनाके मारेगाव
अंशतः अनुदानितवर असलेल्या आणि 60% पगार उचलीत असलेल्या सरस्वती माध्यमिक विद्यालय बाळापुर (बोपापुर) येथील मुख्याध्यापिका सोनल मारोतराव पिंपळकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे हक्काच्या पगारवाढीच्या टप्प्याची वाट पाहणारा पुन्हा एक निखारा विझला अशीच अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली.
झरी तालुक्यातील बाळापूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे सन 2009 पासून सोनल या मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होत्या. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा, दोन मुलांचा सांभाळ करणे यासोबतच शाळेतील शैक्षणिक कामाचा डोलारा सांभाळणे एवढी तारेवरची कसरत करीत त्या आपले जीवनक्रम चालवायच्या.त्यांचे पती अभियंता आहेत. परंतु ते सध्या कामाच्या शोधात आहे.अशातच सन 2024 पासून देय असलेली टप्पा वाढ शासनाने अजूनही न दिल्याने ती वेदनाही सोनलच्या मनात खदखदत होती. अशातच दि. 11 एप्रिलला रात्री 9 वाजता सोनल पिंपळकर यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला. खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
आणि यात सोनलचा दुःखद मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सासू-सासरे,पती,एक मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
===========================
14 ऑक्टोबर 2024 ला शासनाने टप्पा वाढचा आदेश काढत क्षेत्रीय स्तरावर 7 दिवसामध्ये अंमल बजावणी करावी असा स्पष्ट आदेश होता. या आदेशाला 7 महिने झाले तरी त्याची अंमल बजावणी झाली नाही. या काळात हिवाळी अधिवेशन आणि अर्थ अधिवेशन झाले. शासनाने यावर कोणताही निर्णय न घेता शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडणे शिक्षकांच्या बाबतीत नविन नाही. संच मान्यतेमध्ये आता विद्यार्थी संख्या कमी असल्यास आर्थिक दंड सुद्धा आकारला जात असल्याचे वास्तव असल्यामुळे या तणावाखाली ही आत्महत्या झाली.येणाऱ्या काळात शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या सुद्धा आत्महत्या नित्याच्याच होणार आहे.
==========================
– प्रा.पुरुषोत्तम येरेकर ( राज्यसंघटक ) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना.-३३५०/२०२१
