ह.भ. प. राहुलजी महाराज मोरे यांच्या सुमधुर वाणीतून सुरू आहे भागवत सप्ताह
भास्कर राऊत मारेगाव
श्रीराम नवमी उत्सव चिंचमंडळतर्फे अखंड हरिनाम श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. दिनांक 31 मार्च पासून सुरुवात झालेला हा भागवत सप्ताह 7 एप्रिल पर्यंत चालणार आहे. ह. भ. प. श्री राहुलजी महाराज मोरे यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या या भागवत सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री राम नवमी उत्सव समिती चिंचमंडळ तर्फे करण्यात आलेले आहे.

चिंचमंडळ येथील श्रीराम हनुमान देवस्थानचे प्रांगणामध्ये भागवत सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. सात दिवस चालणाऱ्या या भागवत सप्ताह मध्ये सकाळी 6 ते 7 काकडा व भजन आरती, सकाळी 9 ते 11 भागवत कथा,सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ व भारुड, रात्री 9 ते 11 पुन्हा भागवत कथा राहणार आहेत. तसेच दि 2 व 3 एप्रिल 2025 ला रात्री 7 वाजता ह.भ. प.भारुड सम्राट सागर महाराज नंदुरकर आणि दि. 4 एप्रिल ला रात्री 7 वाजता ह. भ. प. भारुड सम्राट खुशाल महाराज वैद्य यांच्या भारुडाचा कार्यक्रम घेण्यात येईल.

भागवत सप्ताह निमित्य 6 एप्रिल 2025 ला सायंकाळी 5 वाजता भव्य रामनवमीनिमित्त दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. 7 दिवस चालणाऱ्या या भागवत कथा ज्ञान यज्ञाचा चिंचमंडळ तसेच परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री राम नवमी उत्सव समिती चिंचमंडळ तर्फे करण्यात आलेले आहे.
