आरोपी विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
भास्कर राऊत मारेगाव
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केल्याची घटना तालुक्यातील मारेगाव शहरात घडली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे मुलीच्या भावाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ही मारेगाव शहरातील राहिवासी आहे. ती नेहमीप्रमाणे दि.28 तारखेला घरच्यांसोबत होती. दि. 29 मार्चला सकाळी उठल्यावर बहीण घरी दिसून आली नाही. म्हणून भावाने तिची घरी तसेच सभोवताल सगळीकडे शोधाशोध केली असता ती कोठेही दिसून आली नाही. तसेच नातेवाईकांना बहिणीबद्दल फोन करून विचारले असता ती नातेवाईकांकडे सुद्धा मिळून आली नाही.
बहिण कोठेच आढळून न आल्याने शेवटी भावाने मावशीच्या मुलाला फोन केला असता मावस भावाने सांगितले की ती माझ्याकडे नाही.परंतु तिच्या लग्नाचे फोटो मात्र माझ्या मोबाईलवर कोणीतरी पाठवलेले आहे. मुलीचे फोटो बघताच मुलीच्या भावाच्या लक्षात आले की हा आपला चुलत मेहुना कृष्णा हनुमंतू कोशट्टीवार वय अंदाजे 22 वर्ष,राहणार मांडवी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड हा असून यानेच आपल्या बहिणीला फूस पळवून नेले आहे असे त्याच्या लक्षात आले.
बहिण अल्पवयीन 17वर्षे 6 महिन्याची असल्यामुळे तिला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यासोबत लग्न करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार भावाने मारेगाव पोलीस स्टेशन येथे केलेली आहे.घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
