भास्कर राऊत मारेगाव,
राजेंद्र सिडाम यांची महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. विजयादशमीच्या मुहूर्तावर ही नियुक्ती करण्यात आली.
राजेंद्र सिडाम हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र ट्रायबल आघाडीमध्ये प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राज्यध्यक्ष ऍड. संतोष भादिकर, उपराज्याध्यक्ष मा. संतोष चांदेकर, चर्मकार समाज आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. किशोर गिरडकर, वणी तालुका अध्यक्ष मा. प्रदीप जुमनाके, वणी तालुका उपाध्यक्ष मा. बळवंत पंधरे, यांच्या उपस्थितीत मा. राजेंद्र सिडाम यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सिडाम यांच्या नियुक्तीने आदिवासी समाजात सर्वत्र कौतुक केले जात आहे. अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र ट्रायबल आघाडीमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून लवकरच त्यांच्या प्रवेशाचा सोहळाही होणार असल्याची माहिती दिली.
