मनसेने केले आयोजन
भास्कर राऊत मारेगाव
भारताचे अनमोल रत्न, प्रसिद्ध उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गीय रतनजी टाटा यांना मारेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच मारेगावकर जनतेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र आणि भारताची शान जगभरात उंचवणारे,भारताचे महान सुपुत्र, महान उद्योजक आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित स्वर्गीय रतनजी टाटा यांना मारेगाव येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय सोळंखे, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी श्री.बाबर यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संतोष रोगे, महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, शहराध्यक्ष चांद बहादे,नगरसेविका अंजुम शेख नबी,आकाश खामनकर,निखिल मेहता,नबी शेख जमीर सय्यद यांचे सहित शेकडो नागरिक सहवेदना प्रकट करण्यासाठी उपस्थित होते.
